श्रावण
श्रावण
श्रावण आला,पाऊस आला
पान फुलांना आनंद झाला
सुमधुर कोकीळस्वर ऐकुनी
माझा तृप्त हा कान ही झाला
नद्या कालवे भरुनी जाती
आनंदाने नाचे धरती
मातीच्या सुवासाने या
अनेक पाऊसगाणी स्मरती
हिरवी कंच ही झाडे झाली
अमूल्य पाचुंच्या ह्या वेली
संतत धारांमध्ये राहुनी
पशुपाखरे झाली ओली
वसुंधरा दिसे नववधू समान
तिच्या स्वागता इंद्रधनू कमान
तेजदामिनी करिती औक्षण
नभात वाहे मेघ विमान
