राखीचा धागा
राखीचा धागा
कसे देवाचे आभार मानू मी कितीक
जीव ओवाळून टाकी भाऊ राया माझा
सोन्यावाणी लेकरं आम्ही हो आईची
डोळे वाटेकडे लावून वाट पाहते भावाची
येता कसेही संकट तारणहार तो माझा ..
भावा बहिणीचे प्रेम जाताजाता ओसंडून
भाऊ नसल्या बहिणीचे दुःख घ्यावे समजून
शोभे मनगटी तो एक नाजूकसा धागा ..
करू नका अपमान लाज राखा या नात्याची
आसुसलेली सदा असे भूक भावाला भेटण्याची
प्रेमाची बोळवण नसे साडी चोळीसाठी त्रागा..
किती करावे मोल त्या नाजूकशा धाग्याचे
सोने-चांदी फिके त्याच्यापुढे महत्त्व शून्य साऱ्यांचे
नाही घातले बंधन तरी कर्तव्या पायी असे जागा ..
