पुस्तक
पुस्तक
आठवणींची पाने चाळता चाळता
सहजच वाटून गेले एकदा
मीही आहे एक पुस्तकच बहुदा
खूप साठल्या आहेत मनात भावना
त्यातला अक्षर अक्षर घेऊन तयार होतील,
खूप कथा आणि कविता
काही हास्याच्या तर काही दुःखाच्या
काही आनंदाच्या तर काही प्रेमाच्या सुद्धा
आठवणींचे हे पुस्तक वाचता वाचता
जाग्या होतील काही तरल भावना,
हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या
काही तरल क्षणांच्या आणाभाका.
शांत बसले असताना कधी कधी
मीच वाचावे माझे पुस्तक
आतल्या शब्दांची उजळणी करता करता
मीच व्हावे माझे मार्गदर्शक.
माझ्यातील कविता कधी म्हणाव्या तालासुरात
माझे जीवन गाणे व्हावे
माझ्याच पुस्तकाचा मी आनंद मनमुराद घ्यावा
लोकांनाही पुस्तकातील अनुभवाचा लाभ द्यावा
खरंच पुस्तक हेच असते जीवन
म्हणूनच आपण ते जगावे प्रत्येक क्षण
