STORYMIRROR

Mrudula Raje

Classics

3  

Mrudula Raje

Classics

अजिंक्य

अजिंक्य

1 min
129

अजिंक्य आहे,अजिंक्य राहील भारत देश माझा 

सा-या दुनियेमध्ये शोभू देत हा विश्वाचा राजा 


महान ह्याची परंपरा अन् महान प्राचीन संस्कृती 

चार वेद अन् पुराण-शास्त्रे, महान आमच्या श्रुती-स्मृती 


संस्कृत भाषा गीर्वाण भारती, करी अलौकिक वाङ्मय निर्मिती

विज्ञान आणि गणितामध्ये सापडते येथेच जगास परिमिती 


रामायण अन् महाभारती मिळती जीवनाचे वस्तुपाठ 

गौतम बुद्ध अन् जैन महावीर समर्पणाचे रूप साक्षात 


देशासाठी लढून झाले अमर किती वीर येथे 

हृदयातून आजही आमच्या जाज्वल्य स्मृती तयांची जागते 


परकीय आक्रमणे येताच आम्ही लढतो एकजुटीने 

उधळून लावू नेहमीच शत्रूंची ती कुटिल कारस्थाने 


आधुनिक जगात वावरण्यास घेतो उच्च शिक्षणाचे धडे 

आमचे डाॅक्टर्स अन् इंजिनिअर्स पाडती विश्वात प्रभाव चहूकडे 


चांद्रयानही पाठवले आम्ही चंद्राचा घेण्या शोध 

अजिंक्य आहे भारत आमचा विश्वाने घ्यावा आतातरी बोध! 


           


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics