जाऊदे
जाऊदे
जाऊदे इतका विचार नको
असं नेहमी घडत असतं
आमच्यासारख्यांचं हृदय
ठेच लागून पडत असतं || 0 ||
खऱ्या प्रेमींची इथे
अशीच असते अवस्था
दाखवला जातो यांना
थेट बाहेरचा रस्ता
नेहमीच आमचं काहीतरी
कुठेतरी अडत असतं
आमच्यासारख्यांचं हृदय
ठेच लागून पडत असतं || 1 ||
मनाला लावून घेऊ नको
वागणं तुझं बिनधास्त होतं
नाही श्रीमंत मी वेडे
मत तुझं रास्त होतं
सर्व सुरळीत असतानाही
काहीतरी रखडत असतं
आमच्यासारख्यांचं हृदय
ठेच लागून पडत असतं || 2 ||

