का आता
का आता
श्रावणात झोपाळा बांधतेस का आता
प्रेम बंधनामध्ये गुंफतेस का आता
वादळी तुफानांची रात्र संपली राणी
स्वप्न प्रेमभंगाचे पाहतेस का आता
आसवे तुझी सारी ओंजळीत घेतो मी
हास्य तू मुखावरचे लपवतेस का आता
साजणी ऋतू आला जीवनात प्रेमाचा
तू मिठीत येण्याला लाजतेस का आता
बंध रेशमाचे तू तोडलेस रागाने
आरशात माझ्याशी भांडतेस का आता

