मैत्री
मैत्री
जसे फुलपाखरू उडे दोन पंखांनी
तशी मैत्री तुझ्या माझ्यातली
एकमेकांसवे घेई
मकरंद तो कुसूमातूनी...
मन तुझे नी माझे
बागडे अवखळ उनाड ते
फुलाफुलांचा गंध घेत
जीवनाची मजा अनुभवे
तू मित्र युगायुगांचा
मी श्वास तू निश्वास रे
कसे सावलीपरी राहे
मैत्र दृढ हे विश्वासाचे
तूझी नी माझी मैत्री
सख्या पौर्णिमेतली
तू चंद्र पूर्ण अवकाशी
मी सागर तवसमोरी
तू आर्त भाबडा मेघ
मी धरा तहानलेली
तूझ्या मैत्रीत सापडे रे
क्षण विसावणारा नेहमी
तूझ्या माझ्या मैत्रीत सख्या
भावना चिंब चिंब नाहती
काटा टोचता मज पाऊली अन्
अश्रू झरे तव नयनातुनी
किती आठवतो डबा सुट्टीतला
जो तू न खाई मजला सोडूनी
माझ्या आवडीचे लोणचे तू
आनी रोज मजसाठी
किती आवडे तूला गुळांबा
मी काढून ठेवी तूजसाठी
मन हळवे होई तेंव्हा
तू हसून पहात राही
तूझी आवडती भैरवी ती
मी आळवे सायंकाळी
तू दाराशीच ऐकत राही
आलापी मन लावूनी ती
संगीत असे तुझा प्राण
मीही सूरांची त्या वेडी
तो सूर निरागस व्हावा
हे दान मागे देवाशी
रात्री सापडे जागा
चंद्र चांदण्यासोबतीला
गिटार काढूनी तू
होई मग्न तारांशी
तूझा नी माझा सहवास
नित्य रमे भटकंतीमध्येही
उंच डोंगरे पाऊलवाटा
तूला नी मला आवडती
रमे मन नित्य माझे
तुझ्या धाडसी खेळांमधूनी
सचिनवेडा तू हिरो आमुचा
मी चाहती तुझीच राही
मन किती स्वच्छंद बनले
सख्या तुझ्या सभोवती
जणू उधळे फुल गोजिरे ते
वारा वाहे नित्य तयांतुनी
जगण्यासाठी प्राणवायू
तशी तूझी नी माझी मैत्री
न जाहले सुखी जीवनी रे
तुजवाचूनी मित्रा आजवरी
तू आहेस प्राण माझा
मी राहू न शके तुजवाचूनी
सुखदुःख भोगते सारे
तुझ्या मैत्रीतले मी
जग फसवे क्षणभंगूर सारे
पण मैत्र चिरंतन राहे
देवांनाही दूर्मिळ ते
अश्रू तव भेटीतले रे..
