STORYMIRROR

Raakesh More

Romance Classics Inspirational

3  

Raakesh More

Romance Classics Inspirational

तुझी आठवण येत आहे

तुझी आठवण येत आहे

1 min
184

आज तुझी खूप 

आठवण येत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 0 ||


जाणीव तुझ्या स्पर्शाची 

आजही तशीच आहे 

अनुभूती हर्षाची 

आजही तशीच आहे 

तीच तीच स्मृती 

पुन्हा देत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 1 ||


का असं स्मरण 

पुन्हा पुन्हा घडतंय 

का असं माझं 

तिच्याशिवाय अडतंय 

या क्षणांचा नक्की 

काय बेत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 2 ||


तुझा भास आहे की 

तू आहेस इथे 

तूच दिसतेस मला 

जातो मी जिथे 

असं वाटतंय मी 

तुझ्या कवेत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 3 ||


तुझ्यापासून दूर आहे 

वाटंत नाही 

तुझा विरह मनात

दाटत नाही 

तुझ्या मिलनाचा 

हा संकेत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 4 ||


फक्त या कल्पना 

असू शकत नाही 

भ्रम आणि वल्गना 

असू शकत नाही 

असं मुळीच नाही 

की हवेत आहे 

प्रेमवेड्या मनाला 

मिठीत घेत आहे || 5 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance