STORYMIRROR

Anushree Dhabekar

Inspirational Thriller Children

3  

Anushree Dhabekar

Inspirational Thriller Children

रम्य बालपण

रम्य बालपण

1 min
187

आठवता बालपणीचे किस्से 

रमून जाते मी त्या विश्वात 

लहानपण देऊन भगवंताने 

ठेवले सदैव मन तारुण्यात 


बालपणीत दुःखाची झळ 

साखर झोपेत विसरते

संवगड्याच्या खोड्या आठवून 

सांजवेळी हिंदोळा झुलते


आंबट गोड चिंचेचा आस्वाद 

आठवता अमृतरस पाझरते

नात्यातील गोडवा पाहता

मैत्रीचे सुखद स्वप्न पडते


भातुकलीचा खेळ आठवता

ओंजळीत सुवासिक फुले पाहते

गाभाऱ्यात भगवंताच्या चरणी

पारिजात वाहून दृढ नाते जपते


रम्य बालपणीत नव्हती देवा

कशाचीच उणीव आयुष्यात 

सुखद आठवणींचा पिटारा

जपून ठेवला आहे हृदयात 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational