STORYMIRROR

Swati Damle

Inspirational

3  

Swati Damle

Inspirational

'रामनवमी '

'रामनवमी '

1 min
789


अयोध्यानगरी उषःकाल झाला,गर्जती दुंदुभि,झडे चौघडा

उभारा गुढ्यातोरणे स्वागताला, पंचारती घेई औक्षणाला चैत्राच्या नवमीचा मुहूर्त हा

माध्यान्ही तळपे रविराज हा

कौसल्याराणीच्या अंकावरी या

रघुवंशउदय झाला पहा

आनंदे,कौतुके औक्षण करुया, पुष्पवृष्टी करा स्वागताला आम्रतरु आज मोहोरला

राजा ऋतुंचा आनंदला

आमंत्री कोकीळ पक्षीगणांना

दशरथ राजास पुत्र जाहला

उत्सव साजरा, वाटू या साख-या, 'श्रीराम ' ठेविले नाम तया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational