प्रीत
प्रीत
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
' प्रीत '
सूर जुळले, शब्द स्फुरले
भाव जागे अंतरी
प्रीतीचा तो गंध ओला
पसरला जादूपरी
भेट स्मरते तीच पहिली
दोन नयनांची खरी
त्या क्षणांनी पाहिलेली
रम्य स्वप्ने गोजिरी
घेतल्या शपथा तिथेही
प्रेमवीणा छेडूनि
रंगलेल्या त्या क्षणांनी
साथ करूया साजिरी
जे तुझे ते तेच माझे
सप्तरंगी जीवनी
एकरूप अद्वैत रंगे
प्रीतीची किमया खरी