ऋतुचक्र
ऋतुचक्र

1 min

626
एकएक पान गळत असतां
झाड कधी रडत नाही
थोडीशीही कुरकूर
पानेसुध्दां करीत नाहीत
कारण,त्यांना असते जाणीव
निसर्गाच्या नियमांची
उत्पत्ती, स्थिती, लय
या नियतीच्या खेळाची
त्यांच्या त्या त्यागातच
महती असते बहराची
लवकरच फुटणा-या
हिरव्यागार पालवीची