श्रावण सरी
श्रावण सरी

1 min

120
सरींवर सरी श्रावणसरी
गोरीगोरी जोरकस एखादीच खरी
श्रावणसरींचा सुंदर नाद
चमकून तडिता देती साद
काळा काळा मेघ दाटून आला
थेंब थेंब बरसून रिकामा झाला
थेंबातून आरपार शिरलं ऊन
एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऊन
ऊनपावसाच्या या मजेदार खेळात
इंद्रधनु खुललयं निळ्या आभाळात
देवाची करणी पाणीच पाणी
हिरवी शेते गातात गाणी
मरगळ झटकून टाकती जीव
भन्नाट वारा घालतो शीळ
श्रावणात येतो सणांना पूर
गावागावांचा बदलतो नूर
पानोपानी फुलतो ताटवा
मोहित मनांना देतो गारवा
सरींवर सरी श्रावणसरी
अलगूज वाजे घरोघरी