ओढ पावसाची
ओढ पावसाची
अरे पावसाच्या राणा
तुज येई ना करूणा
जरा उघडोनी डोळा
पाही साम्राज्याची कळा
किती तुडविती पायी
पाण्यासाठी दिशा दाही
तप्त फोडांना निववी
मग डोळ्यांतील पाणी
अग्निवर्षावे उजाड
झाली रानाची वसती
जीवनाच्या शोधासाठी
वन्यप्राणी ये घरासी
मैलोगणती शोधूनि
बळ पंखियांचे सरे
 
; चोची भिजण्याआधीच
चोच वासूनि पडले
नद्या,नाले,तळी,खोरी
झाली कोरडी ही सारी
तडफड त्या जीवांची
पाण्याविना हो थांबली
येई येई झडकरी
धावं घेई रे वरूणा
भिजविण्यास ना उरे
आता अश्रूही कोरडा