पूर आणि नेतेगिरी
पूर आणि नेतेगिरी
🌊🌊🌧️ *पूर आणि नेतेगिरी* 🌧️🌊🌊
पाण्याचा पूर ओसरायला लागला,
नेत्यांचा थवा गावागावात दिसायला लागला l
देतील तुम्हाला किराणाची थैली ,
येऊन म्हणतील बाजी मारली आम्ही पहिली l
फोटोशूट तर असा करतील जसा काय ट्रेकिंग करतो आहे ,
पण ते हे नाही जाणतील शेतकरी खरच किती झुरतो आहे l
शेतीमालाचे नुकसान पाहून दोष म्हणतील पाण्याचा ,
फोटो काढून फायदा घेतील तुमच्या डोळे ओल्या पापण्याचा l
बांधावरून लावतील तिथून दोन फोन अधिकाऱ्यांना,
वरचेवर म्हणतील नुकसान भरपाई द्या शेतकऱ्याला l
अरे तुम्हाला जर खरंच वाटतं तर तुमची पेन्शन सोडा ,
आणि फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच लढा l
विकासाचे बॅनर घेऊन नाचले एका एका मतासाठी ,
आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी बघा एका एका पिकासाठी l
आखाडतोंडापासून तर सरकारने लुटलं ,
ऐन घासतोंडी पडायच्या वेळी आभाळच फाटलं l
आदी वाढवल्या तुम्ही किमती शेती साहित्याच्या ,
आता देताय जीएसटी कपाती श्रीमंताच्या फायद्याच्या l
अरे मान्य आहे तुमचं भेटलाय दिलासा सगळ्यांना ,
पण यातून न्याय कसा देणार तुम्ही शेतकऱ्यांना l
मानले श्री गजानन महाराज संस्थानला,
एक कोटी अकरा लाखाचा धनादेश दिला शेतकऱ्यांला l
मंत्र्यांपेक्षा काही आमदार बरे ,
जे आहेत खरच महाराष्ट्राची हिरे l
निदान योग्य वेळी जाऊन तर बघतायेत ,
थोडा का होईना धीर देऊन शेतकऱ्यांना जपतायेत l
✍️
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट
९६७३१५८३४३
अंजनी बुद्रुक

