llनिरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ll
llनिरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ll
*Il निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ll*
ना गरिबाचा ना श्रीमंताचा ,
बाप्पा तर आहे आपल्या सर्वांचा ll
गेलेत अकरा दिवस होऊन ,
आता वेळ विसर्जनाची,
डोळे भरून तुला बघण्याची ll
बाप्पा तुझ्या गजराच्या सानोंरंगात,
नाचले सगळे जण,
तुझ्या जाण्याने होणाऱ्या वेदनाही
किंचित हसण्यास लावतय मन.
गोडधोड मोदक खाऊन
सर्वच झालेत मस्त ,
गणपती बाप्पाच्या जाण्याने,
नकळत मन हे होईल त्रस्त ll
चुकले असेल तेव्हा काही,
तिथे माफी असावी ll
निरोप घेतोय देवा तुझा,
आम्हा आज्ञा असावी ...ll
तुझ्या आगमनाने बदलली
होती जगाची सगळी छटा,
जात-पात विसरून सगळे
झाले होते एकाच वाटा ll
गरिब-संपन्न सगळ्यांचा तू साथीदार,
आम्हा सगळ्या मनाचा श्रद्धार ll
पुन्हा एकदा येऊन दे साक्षी,
पुन्हा फुलव आमचे घर दार ll
विसर्जनाची ही वेळ,
पण निष्ठेची नवी सुरूवात,
पुढच्या वर्षी पुन्हा ये,
भरभरून दे आनंद हृदयात ll
ll *गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या* ll
✍️
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
पुसद
९६७३१५८३४३
