निःशब्द 😪
निःशब्द 😪
*निःशब्द 😪*
का एवढा आघात झाला,
निर्दोष जीवांचा घात झाला.
आईवडिलांच्या स्वप्नांवर,
क्रूर काळोख्या रात झाला.
नाही दया, नाही भान,
हरवला का हा मानवपण.
गुन्हेगारावर नाही धाक,
न्यायाचा उरला फक्त ढोंग-ध्वजाक.
सरकारही थंड, जनता मौन,
न्यायाचा आवाज झाला क्षीण.
दोन दिवस सारे शोक करतात,
तिसऱ्या दिवशी विसरतात.
आमदार खासदार कुठं गेले,
चिमुकली जागी ते का नाही मेले...
एरवी प्रशासन हाताशी धरतात,
अशा वेळेला का ते मागे सरतात?
कधी उठेल मनुष्यपण जागा,
कधी संपेल अपराधांचा धागा?
सरकार पण असच षंढ झालं,
अशा किती पीडितेंच भल त्यांनी केलं.
दोन दिवस सर्वच शोक दाखवतात,
आपल्यातला राक्षस कधी कुठे मारतात.
उत्तर नाही, राहिला संताप,
मनात फक्त निःशब्द दाह ताप.
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट
९६७३१५७३४३
पुसद.

