मोबाईलची व्यसन दोरी
मोबाईलची व्यसन दोरी
📱📱📱 *मोबाईलची व्यसन दोरी* 📱📱📱
जो तो सध्या मोबाईलमध्ये डोक खुपसून बसलाय,
माहित नाही खरंच कोणता देव त्यांच्यावर रुसलाय.
कोणी बुडायला लागलं की व्हिडिओ फक्त काढतात,
पण पाण्यातून बाहेर काढायला मात्र हातपाय झाडतात.
तरुणांना लागलंय व्यसन हे मोबाईलचं,
जाणं-ओळख नाही उरलं आता माणुसकीचं.
मंदिरात जरी गेले तरी मोबाईलवर नजर असते,
नमस्कार-टाळ्यांच्या ऐवजी कॅमेरा उघडलेले बसते.
बाहेर फिरायला गेलं तरी हेच चित्र दिसतं,
डोळ्यांसमोर निसर्ग, पण लक्ष मोबाईलमध्येच अडकून बसतं.
आज मोबाईलमुळे हातपाय चालेनासे झाले,
फक्त बोट चालवून शरीर आळशी करून टाकले.
कामाचं जे आहे ते सोडून बाहेर ढकललं,
चॅटमध्ये फक्त 'सिंबॉल हात जोडून' टाकलं.
जगता-जगता प्रत्येक जण स्क्रीनमध्ये अडकला आहे,
प्रेमळ मायेचा, जवळिकीचा स्पर्श हरवला आहे.
पण आता वेळ आहे या व्यसनातून बाहेर पडण्याची,
स्वतःचं आयुष्य घडवून जगासमोर उभं राहण्याची.
मनात वाटतंय खरंच—
निसर्गरम्य ठिकाणी जावं कुठेतरी,
आणि कायमची फेकून द्यावी ही मोबाईलची दोरी.
✍️
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट
९६७३१५८३४३
अंजनी बुll
