श्रमांचा न्याय (संघर्ष आणि शोषणाचे चित्रण)
श्रमांचा न्याय (संघर्ष आणि शोषणाचे चित्रण)
श्रमांचा न्याय
(संघर्ष आणि शोषणाचे चित्रण)
बारा तासांचा गज उतरलाय डोक्यावर,
कामगार मात्र अडकला आहे दगदगीतल्या चौकटीवर।
घामाचा ओघळ पैशात मोजला तरी,
पोटाच्या भाकरीसाठी सुटत नाही तरी।
एकेकाळी नऊ तास म्हणायचो मर्यादा,
आता बारावर नेऊन नशीबाची केली टोळचिंधाडा।
"Ease of Business"चा गजर वाजतो ऊठसूट,
पण मजुरांची पाळे पडलीत थकव्याच्या खुटखुट।
जेथे श्रमाला न्याय हवा होता,
तेथे शोषणाचा हात भार वाढवतो आहे।
ओव्हरटाईमच्या नावाखाली गाजर दाखवताहेत,
पण आयुष्याचं रितं भांडं अजूनही भरत नाहीये।
थकलो तरी यंत्रासारखा राबावं लागतं,
माणुसकीला विसरून अविरत चालतं।
सत्तेच्या कारखान्यात घड्याळाचे काटे जिंकतात,
पण कामगारांचे स्वप्न मात्र रोज हरवतात।
जमिनीवर घाम गाळणारा हा खरा राजा,
तोच आज कैदी झालाय श्रमकायद्याच्या ताजा।
उद्याचा लढा होईल खरा प्रश्नांचा,
न्याय हवा श्रमिकांचा, नाही खेळ आकड्यांचा।
✍️
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
९६७३१५८३४३
पुसद
