विद्यार्थी गुणगौरव सोहळा - एक उत्सव
विद्यार्थी गुणगौरव सोहळा - एक उत्सव
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा एक उत्सव*
विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा एक "कार्यक्रम" नसतो
तर,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या "मेहनतीचा कुटुंबाचा व त्यागाचा उत्सव असतो" ll
येतील कितीही एरेगैरे तुला करतील सगळ्यांमध्ये वैरे,
तरीही तू त्यांच्यासोबत राहून सगळ्यांचे मन ओळखून घेरे ll
तुझ्या यशाच्या गाथा पाहून जळतील सर्वजण,
तरी पण तू सोडू नकोस तुझ्या स्वप्नांचा गण ll
या जगात जन्म देऊन आई-वडिलांनी केले त्यांचे स्वप्न त्याग ,
तरी तू विझू देऊ नको तुझ्या अंतर्मनातली आग, आणि त्यांची स्वप्न त्यांना मिळतील असच तू वाग ll
मागून काय बोलल कोणी याचं भान ठेवू नको ,
वेडा वाकडा विचार करू मार्ग कधी सोडू नको ll
यश तुझ्या पदरी पडलं की येतील सर्व जण ,
तरी तू आई-वडिलांचा विसरू नको कधीच प्रण ll
यश तुझ्या पदरी येईल एक दिवस नक्की ,
मनात तुझ्या विचार करून ठेव ही हमी पक्की ll
जरी मागे काही बोलत असतील तरी पण,
यश तू मिळवल्यावर कौतुक करतील तुझे सर्वजण ll
विसरू नकोस त्या सर्व गुरुजनांना ,
ज्यांनी यशाचा मार्ग दाखवला सर्वांना ll
असंच समाजामध्ये नाव मोठं कर ,
मोठा झाल्यानंतर समाजाला एकत्र तू कर ll
आहे तुझ्या मध्ये जिद्द ती तू सोडू नको ,
निराश होऊन तू मात्र डोकं फोडून घेऊ नको ll
कर प्रयत्न पुन्हा आणि पुन्हा उभा रहा ,
आयुष्यात सक्सेसफुल होण्याचीच तू स्वप्न पहा. ll
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
अंजनी बुद्रुक
९६७३१५८३४३
