शेतकऱ्यांची व्यथा
शेतकऱ्यांची व्यथा
*शेतकऱ्यांची व्यथा* 🌿🎋🌾🌾🌾
ऐकताहेत का साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे हाल
ऐकताहेत का मंत्री साहेब तुम्ही शेतकऱ्याचे हाल,
घरात नाही दाणा अन् डोळ्यात स्वप्नांचे महाल ll
जिकडे पहावं तिकडे सगळं पाणीच पाणी झालं,
बहरून आलेल्या मालाच सगळ मातीमोल झालं l
खताची पिशवी गेली २ हजाराच्या घरात
खताची पिशवी गेली २ हजाराच्या घरात ,
कष्टाने पिकवलेले अन्न धान्य गेले वाहून पुरात l
कधी येतील दिवस ते शेतकऱ्यांचे सुखी
कधी येतील दिवस ते शेतकऱ्यांचे सुखी ,
सरकार नेहमीच करतंय त्यांना दुःखी l
नको तुमची मदत अन् भिकेची तुडकपुंजीची पहल,
शेतीमालाला भाव द्या फक्त शेतकरी होऊन जाईल बहाल l
खर्च जातोय वाढत भावही तसाच गाठतोय ,
दाणे झाले स्वस्त अन् खताचा भाव मात्र वाढतोय l
लुटतात तुम्ही शेतकऱ्याला सगळे ,
लुटलेल पुन्हा वाटून देताय राजकारन्याला होताहेत ते बगळे l
काय ते म्हणे छबीदार छबी अन् शेतकऱ्याची सुगी,
वाढतेय कर्ज अन् उपासमारीची वाढ उगी l
सांगताय तुम्ही माईकवर देतोय हेक्टरी आठ हजार,
शेतीमालाचे भाव जातील काहो १० हजाराच्या पार l
तुम्ही असाल एका बापाचे तर,
भीक नको तुमची फक्त शेतीमालाला भाव द्या,
शेतकऱ्यांचा कष्टाना तुम्ही खरच न्याय द्या....ll
✍️
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट
९६७३१५८३४३
अंजनी बुll
