समाजहिताची वाटचाल
समाजहिताची वाटचाल
*🌹 समाजहिताची वाटचाल 🌹*
स्वतःपुरते जगणे कधी, फुलांसही न शोभते,
आपुल्या सुगंधानेच का, जीवनाला अर्थ बहुते.
जगण्याची खरी कमाई, इतरांस दिलेली साथ,
समाजासाठी केलेला, एक वाटसरूचा हात.
ध्वज कोणताही असो उंच, रंग निराळे जरी भासती,
विचारांतली ओळख मात्र, स्वतःचीच ठाम दिसती.
हसरे चेहरे उमलतील, जेव्हा एक हात पुढे सरकेल,
दु:ख हरपून जाईल सारे, जेव्हा कुणासाठी मन जपेल.
म्हणूनच चला, सोबती होऊ, परस्परांना साथ देऊ,
वैयक्तिक प्रगतीसोबत, समाजहिताची वाट चालू. 🌿
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
९६७३१५८३४३
अंजनी बुll
