ऊसतोडणीची व्यथा
ऊसतोडणीची व्यथा
*ऊसतोडणीची व्यथा*
उसन जुन फेडाया,
चालले ऊस तोडाया,
घर कसे ओसावले,
नशीब कुठं गमावले.
नाही सुख यांच्या ठायी,
तसेच समाधान मिळाले.
मुलबाळ घेऊन सोबतीला,
निघाले ऊस तोडणीला.
शाळा असते नावाला,
पोट भरण्याचा गोला.
उसने पैसे घेतलेले,
कर्ज तेच फेडायला.
नाही घर राहायला,
वर चांदण सोबतीला.
राब राबत दिनरात,
असो वेदना कितीही उरात.
ना त्यांच्या धार कोयत्याला,
ना त्यांच्या आधार हाताला.
दिवस काट्यावरच्या कसरतीत,
रात्र घालवतात झोपडीत.
येवो सुख यांच्या पदरी,
नको नशिबाची वारी.
✍️
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट
पुसद
९६७३१५८३४३.
