STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

5.0  

Sunita Ghule

Tragedy

पुलवामा भ्याड हल्ला

पुलवामा भ्याड हल्ला

1 min
567


चौदा फेब्रुवारी दिनी

प्रेममय झाले जग

साप आस्तिनीत छुपा

फुत्कारला जणू नाग।


बाँम्ब मानवी घातक

बसवर आदळला

प्राण घेतले क्षणात

घात जवानांचा झाला।


अस्ताव्यस्त अवशेष

लोट धुराचा आकाशा

ज्वाला वेढल्या भोवती

सुटकेची नाही आशा।


बेचाळीस वीर शहीद

हकनाक आले कामा

देशासाठी प्राणार्पण

नीच पाक कारनामा।


शत्रूत्वाला निभावले

पाठीवर केला वार

झुंज द्यायची हिंमत

दाखवावी आरपार।


कुणी पती,कुणी पुत्र

गमावला माते लाल

अश्रू झाले अनावर

कसा कोपला काळ।


शोक, संताप,भितीने

आक्रंदला देश सारा

भारतीय सैनिकांचा

क्रोधरूपी चढे पारा।


चेचायचे गद्दारांना

मनी निर्धार योजिला

मनसुबा पूर्ण केला

कामरान निर्दालला।


अहिंसक मार्ग पुरे

अवलाद ही छाटावी

अतिरेकी नायनाट

पाळेमुळे हो काटावी।


पुलवामा भ्याड हल्ला

सल बोचरी जखम

कटिबध्द सुड घेण्या

शीर करण्या कलम।


अरपू तेव्हा श्रद्धांजली

धडा पाप्यांना शिकवू

बसणार नाही शांत

आतंक्यांना हो मिटवू।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy