STORYMIRROR

Vijay Sanap

Comedy Drama

2  

Vijay Sanap

Comedy Drama

पत्नी पिडीत पती

पत्नी पिडीत पती

1 min
3.0K


नादी बाबा बायकोच्या

नाही केव्हाच लागत

काय सांगू नाही माझंं

तिच्या वाचून भागत ।।


घरी दारी कुरकुर

कुठं रोज रागवावं

नित भांडण करुन

कसं उपाशी निजावं ।।


येता जाता मलाच ते

घ्यावं लागतं ऐकून

केले जगणे कठीण

ठेऊ कसं मी झाकून ।।


रोज करते शॉपिंग

म्हणे नवरोबा भोळा

कुठं लागावं नादाला

तीच करी गाव गोळा ।।


जाता बायको माहेरी

घेई मी मोकळा श्वास

सांज वेळी आल्यावर

मिळे सुखाचा तो घास ।।


घरी येण्याआधी तिच्या

घेतो सारुन पसारा

तिचे डोळे पाहून मी

करे हसरा चेहरा ।।


दम देऊन बोलते

जरा नजर सांभाळा

येता जाता बायावर

काना दिसतोय डोळा ।।


सांज सकाळच्या वेळी

मस्त मजेत फिरतो

घरी जाण्यास बाबा रे

जीव माझा घाबरतो ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy