Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Abstract Classics Fantasy

3.0  

Ajay Nannar

Abstract Classics Fantasy

प्रवास पहाटेचा

प्रवास पहाटेचा

1 min
143


धुक्यात हरवलेला घाटमाथा

पूर्वेला छटा सोनेरी किरणांची

गुलाबी थंडीची बातच न्यारी

नव्हतीच गर्दी रस्त्यावर वाहनांची


गार हवेची झुळूक सळसळली

आणी धुंद करूनी मनाला गेली

शुभ्र पांढरे धो धो फेसळणारे निर्झर

वनवेलीच्या आडोश्याला लुप्त झाली


काळी डांबरी सडक तशी 

आज शांत दिसत होती

दिवसभर अंगावर झेलणाऱ्या

वाहनांची वाट पाहत होती


मधूनच आजूबाजूची गवताची पाने 

एकमेकांना सारखी खुणावत होती

गाड्यांच्या आवाजाची आठवण काढत होती

मध्येच पडलेल्या प्रकाशाने दिपत होती


टेपरेकॉर्डरची भावगीते 

मनला मंत्रमुग्ध करत होती

मध्येच पक्षांच्या थव्याने नजर

सभोवताली भिरभिरत होती


डोंगराच्या अडून रवीने डोकावले

आणि दर्शन झाले सूर्य नारायणाचे

एका रम्य पहाटेची सांगता झाली

निसर्गाच्या साथीने वर्णन संपले पहाट प्रवासाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract