मोरया
मोरया


गणेशोत्सव आला म्हणजे लगबग, मंडळांचा गणपती, घरचा गणपती. आनंदोत्सव. सकाळी लवकर उठून आरतीची तयारी. या दहा दिवसाच्या आनंद आहे पन माणूस अजुनही कष्टाचे घाव सोसतोय च...
प्रतीक्षा संपली आगमनाची,
सुवर्णांची ललकार घेऊनी
गणाधीशाची स्वारी आली....
दिस उजाडला आगमनाचा...
पहाटेच्या प्रहरी चाहूल लागे गणरायाची.....
गल्ली गल्ली त एकच नाद येई
आई देव बाप्पा इले....
प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी....
दुर्वा, हार, मोदकाची बघा घाई...
आरस करण्या मंडळांची
झालीया लगबग......
जास्वंदीच्या फुलांचा हार शोभे बाप्पाला....
मोदकाचा प्रसाद आवडे बाप्पाला....
एकदंत, मोरेश्वर, चिंतामणी
नावे असंख्य....
नाव अनेक भक्ती एक....
भेटी लागे जीवा...
दर्शनाची ओढ लागे भक्तांना.....
लालबागचा राजा, दगडूशेठ सोन्याच्या गणपती.....
अनेक रुपे......
जाता जाता मानुस ही घडवला,
सोन्याची मुर्ती घडवणारा माणूस,
आहे दगडाच्या काळजाचा.....
घाव घेतोया अंगावर,
टाकाचे नव्हे पेटत्या ज्वालेचे अंगार.....