STORYMIRROR

Ajay Nannar

Romance Classics

3  

Ajay Nannar

Romance Classics

तुझ्या आठवणींत मी

तुझ्या आठवणींत मी

1 min
189

पहाटेच्या प्रहरी, 

आठवण तुझी येता..... 

 जणू पारिजातकाच्या सुगंधानी...

 ती पहाट तुझ्या आठवणींत.... 

दरवळून जाते..... 


गारव्याची थंड वाऱ्याची... 

लाजरी झुळूक येती .... 

जणू तुझ्या माझ्या स्पर्शाची.... 

जाणीव मजला करुनी देती....


स्पर्श तुझा माझा

सहसा आठवणींत नसलेला.... 

तो ही विरुन गेलाय... 

तुझ्या माझ्या आठवणींसारखा..... 


सायंकाळच्या सांजेच्या प्रकाशात.... 

 तो सुर्य ही ढगाआड लपलेला.... 

तसाच मी ही तुझ्याच

आठवणीत विरलेला.... 


रात्री चंद्राच्या चांदण्यात.... 

ताऱ्यांच्या प्रकाशात.... 

तुलाच शोधत असतो.... 

रात्र रात्र तुझ्याच आठवणींच्या विचारात 

मी काढत असतो.... 


शब्दांत सांगता येणार नाही

असे माझे प्रेम..... 

अस्मितेच्या नव्या वळणावर.... 

 अमावस्ये पासून पौर्णिमे पर्यंत 

 जाते वाढत...... 


खूप काही सांगायचे आहे.... 

सांगता येणार नाही..... 

ते ही साठवून ठेवलयं..... 

तुझ्या आठवणींत..... 


आयुष्याच्या वाटेवर तुझ्या आठवणींत.... 

चाललोय पुढे..... 

वळूनी मागे पाहता.... 

जाणीव तुझ्या अस्मितेची.... 


अस्तित्व माझे... माझे नसले तरी

ते तुझ्यातच आहे..... 

कारण माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट तुच आहे.... 


आता कवितेचा प्रत्येक ओळीत 

तुझचं नाव येतंय....

उरल्यासुरल्या आठवणींत

ते ही सातासमुद्रापार वाहवत जातंय...... 

तुझ्याच आठवणींत..... 


 तुझ्या आठवणींना नाही किनारा

भरती ओहोटी सारखं ते अजूनही जणू वाढतंच चाललंय....


कळू दे प्रेम जरा ,

तुझ्याही ह्रदयातले…

सोपे होईल मग मलाही ,

सांगणे मनातले…..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance