STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

प्रवाहाच्या विरोधात

प्रवाहाच्या विरोधात

1 min
1.0K



वाहत जावं कधीतरी, प्रवाहा च्या विरोधातही

जाणीव होते आपल्याला, आपल्याच क्षमतांची

आपल्या आतल्या अमर्याद शक्तीचं होतं प्रदर्शन

बळं येतं एक प्रकारचं अंगी, कापायला कठीण अंतर

शरीर थकलं तरीही,

मन चल प्रयत्न कर म्हणतं


हार नको मानुस तु,प्रयत्नांती शेवटी परमेश्वर

दृढ होते इच्छाशक्ती, जर मनात असेल उमेद

मन होतं घट्ट, पाषाणा सारखं महा कठीण

घावही बसत नाहीत, त्यावर जर कोणी वार करील

साहस, धैर्य जोपर्यंत आहे हया रक्तात ठाण मांडून


कुठेच कुठलाच मार्ग बसणार नाही अडून

आणि इच्छित स्थळी पोहचून जेव्हा बघेन मागे वळून

दिमाखात असेन उभी स्वाभिमानाचं स्मित चेहऱ्यावर लेवुन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational