प्रतिक्षा
प्रतिक्षा
पूर्ण होण्यास माझ्या मनाची आशा
करावयास हवी काही क्षणांची प्रतिक्षा
असे अधीर क्षितिजासम माझे मन
आतुर परी द्यावया धरणीस आलिंगन
गगनी झळकतसे ताऱ्यांचा मंद प्रकाश
या उजेडात दिसे भावी स्वप्नांचे आकाश
रविकिरणांची लालिमा पसरे सायंकाळी
लाजून खुले कशी ओठांवरची कळी
यावास तू सदाचा कधी न जाण्यासाठी
संपावी शीघ्र प्रियकरा घडी ही प्रतिक्षेची