परत घरी येशील का? ...
परत घरी येशील का? ...
परत घरी येशील का ?
या डोळ्यांना सुख देशील का ?
तू गस्त देतो सीमेवर
मी प्रेम करते तुझ्यावर
सांग कधी माझा होशील का ? ...
या वीरहासवे ना जगणे
ऐक माझ्या मनाचे मागणे
खूप दिवस झाले
दसरा दिवाळी सण उत्सव गेले
तरी या डोळ्यांनी कधी
ना सोहळे साजरे केले ...
ये ना ऐकदा ऐक माझे
प्रेमाचे तुला बोलावणे
सांग तुझ्या कर्तव्याला
मला तिचा एकदा होऊ दे
परत जा भेटूनी
मी येणार नाही आड
पण निदान शेवटची आस
डोळा भरून पाहू दे ...
सख्या ...
नको मला चंद्र सूर्य
नको दागिने महागडे
तुझ्या प्रेमाची काळी पोत
माझ्या उराजवळी असे
तेवढाच तू माझ्या जवळ
ये एकदा हृदया जवळ
स्पंदने ऐकुनी तुही म्हणशील
सांग माझ्यावर किती प्रेम करशील
तृप्त कर डोळ्यांची तृष्णा
तूच माझा कृष्णा
या डोळ्यांना सुख देशील का ?
परत घरी येशील का ? ...