STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

मी साद घातली...

मी साद घातली...

1 min
295

मी साद घातली तुला ,

ओ दे ना मला ,

तुझ्याच उत्तराची ,

कधीची आतुरता मला ...

मनबंध बांधते प्रीतीचे ,

गुज ऐकुनी घे तु ,

उधाण आले मनाला ,

एकदा होकार दे तू ...

अशा या गुलाबी क्षणी,

लाजुनी नको ठेवू मनी,

अधरावर येऊ दे ,

प्रेमाची अबोल कहानी ,...

ये सवे चालू सोबतीने ,

गाऊया मिळून प्रेम तराणे,

मनाचा ऋणानुबंध नवा ,

नव्या स्पर्शाने मनाचे बहरणे ...

ही साथ मनापासुनी ,

तूच माझा सोबती ,

नाही आता दुसरा कुणी,

जीवनात माझ्या ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract