STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

कुठे होते सुरवात

कुठे होते सुरवात

1 min
276

कुठे होते सुरवात जीवनाची ,

आईच्या उदरात की ,

त्या पहिल्या रडण्यात ,


पहिल्या पडणाऱ्या पावलात की ,


पहिल्या बोबड्या बोलत ,


कुठे होते सुरवात ...


बाबांच्या शिकवण्यात की ,


शाळेच्या पटांगणात ,


चुकलेल्या वयात की ,


भाळलेल्या मनात ,


कुठे होते सुरवात ...


पहिल्या पगारात की ,


बोहल्यावर चढण्यात ,


तुम्ही आई-बाबा झालात की ,


सोड ना तुला नाही कळत ऐकण्यात ,


कुठे होते सुरवात ...


आसवं डोळ्यात शेवटच्या क्षणात की ,


सरणावर पडलेल्या देहात ,


शांत शांत निजण्यात ,


कुठे होते सुरवात ...


कुठे होते सुरवात जीवनाची ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract