STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

मन का? ऐकत नाही माझे...

मन का? ऐकत नाही माझे...

1 min
355

मन का? ऐकत नाही माझे ,

का? होत नाही हे स्वतःचे ,

नको नको म्हटलं की ,

पतंग होऊनी आसमंती उडे ...

मन का? ऐकत नाही माझे...

सुख याला सदैव कुठे भावे ,

वेचुनी काटे कधी आनंदे,

सोन्यांचा पिंजरा अडथळे,

निवांत जमिनीवर पडे ...

मन का? ऐकत नाही माझे...

तुटता हृदय तळमळे ,

सोडूनी देह दुर पडे ,

कोडमडून कधी रडे,

कधी सावरून देई धडे...

मन का? ऐकत नाही माझे...

मनासारखे सुंदर सोज्वळ,

या दुनियेत नाही बरे ,

अदृश्य तरी हक्क गाजवी खरे,

माझे असुनही नसे माझे ...

मन का? ऐकत नाही माझे...

मन तेवढेच दुष्ट ,

अशांत खवळलेला सागर,

वाहून नेईल सर्व कधी ना कळे,

आवरा लगेच जेव्हा ही जखम भळभळे...

मन का? ऐकत नाही माझे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract