STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

का? हा सुर नाराजीचा ...

का? हा सुर नाराजीचा ...

1 min
364


का? हा सुर नाराजीचा ,

तुझ्याविना नाही कुणी ,

तूच तू तूच तू जीवनात ,

शब्दं माझा मी तुझ्या प्रेमात...

(अशी जातांना आसवे नको डोळ्यांत,

एकदा हस मग जा परत ...)

अगं वेडे काही दिवसाची गोष्ट ,

मी इथेच मन माझे तुझ्यातच ,

फक्त मी नाही पण सदैव गं ,

मन माझे तुझ्या आठवतच ...

(अशी जातांना आसवे नको डोळ्यांत,

एकदा हस मग जा परत ...)

मी नाही अप्रामाणिक विश्वास ठेव,

नको शंका मनात ध्यानात ठेव ,

तुझ्या सोबतीचे क्षण माझा प्राण,

भास तुझा राहील सोबत जाण ...

(अशी जातांना आसवे नको डोळ्यांत,

एकदा हस मग जा परत ...)

नको ही उदासी चेहऱ्यावर ,

तु माझी मी तुझा जन्मोजन्मीचा,

दुरावा आहे काही क्षणाचा ,

तु माझी मी तुझा कायमचा ...

हा प्रवास आहे सोबतीचा ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract