STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

प्रसन्नता

प्रसन्नता

1 min
28.5K


उंच आकाशी, चंद्रप्रकाशी

फुलल्या चंद्रकळ्यांच्या राशी

लुकलुकणाऱ्या शुभ्रचांदण्या

प्रसन्नतेने खुलवी मनाशी


क्षणभराचे ते लुकलुकणे

चंद्राकडूनि प्रकाश घेणे

आणि जगाला देत रहाणे

प्रसन्नतेचे शुभ्र चांदणे


तऱ्हेतऱ्हेची फुलेही दिसती

रंगीबेरंगी अवती भवती

काट्यांमध्ये जरी राहती

प्रसन्नताच परी जगास देती


क्षणाचेच ते असे उमलणे

अल्पकाळ जरी आहे जगणे

एकच ठावे असे फुलांना

सृष्टीमध्ये सुगंध भरणे


अल्पशक्तीची असून पणती

सदैव राही ती मिनमिणती

कळते अंधार झाल्यावरती

त्या पणतीची जगास महती


मंदगतीने सदैव तेवते

भास्करास विश्रांतीही देते

यथाशक्तीने प्रकाश देते

जगताला उजळून टाकते


समयशक्ती नि वित्त मिळूनि

असे निराशा मानव जीवनी

सुज्ञ मानवा तू घेई ध्यानी

फुलाफळांची जीवन गाणी


मिळेल तेथून मिळवत जावे

ज्ञान प्रकाशी जगी फ़ुलावे

नैराश्याला दूर सारुनि

प्रसन्नतेने सदा जगावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational