STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Others

4  

Supriya Devkar

Abstract Others

प्रश्न

प्रश्न

1 min
198

एक साधा प्रश्न माझा 

आनंदाने जगाव कसे?

हिरमुसलेल्या चेहर्यावर 

हासू आणावे तरी कसे?


कोणी लपवतो वेदना मनात 

सांगा बरे ओळखावे कसे?

न बोलणार्याच्या वेदनांना

बोलते करावे तरी कसे?


कोणी साठवतो दुःखाचा बोजा 

सांगा बरे उतरवावा कसे?

दडलेल्या भावनांचा आता 

निचरा करावा तरी कसे?


कोणी ओकतो मनातली आग 

सांगा बरे थाबंवावे कसे?

ज्वलंत विषयावरचे औषध 

शोधावे बर आता कसे?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract