प्रोत्साहन
प्रोत्साहन
पुरस्काराच्या पत्राने मन भरुन येतं
कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं
येणा-या फोनमुळे मन सुखावतं
अंतर्मन आपुलकीच्या जाणीवेनं सुखावतं
खरे तर नुसतेच निमंत्रण आलेले असते
मैत्रिणींच्या हौसेला मोल नसते
सख्यांची तत्परता मनाला भिडते
अनावर प्रेमाची ओढ मनाला भावते
गोडशा मिठाईचा पुडा असो
वा लिखाणाच्या सदिच्छेचे पेन असो
माहेरच्या नात्यानी दिलेली "साडी" असो
वा प्रेमभराने केलेले अभिनंदन असो
झटक्यातली प्रतिक्रिया मनावर मोरपीस फिरवते
पुस्तकांचे प्रोत्साहन मन सुखावते
लेखनप्रवासाला कौतुकाचे बळ मिळते
लाभातल्या शुक्राच्या मैत्रिणींचे
आभार मानते
