STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

प्रलय...!

प्रलय...!

1 min
13.8K



प्रलयाची कल्पनाही करवत नाही

इतका निसर्गाचा प्रकोप जाणवतो

सारे सारे लिलया वाहून नेता नेता

आपल्या ताकदीचे दर्शन तो घडवतो


हतबल मानव होतो

आणि पहात राहतो

एकमेकांच्या मदतीसाठी मग

प्रत्येकजण धावून जातो


माणुसकीचे सहिष्णूतेचे पेव फुटता

मदतीचे ओघ सुरू होतात

हवसे नवसे गवसे सारे

क्षणात धावून जातात


मला वाटते स्वयंपूर्ण केरळला

आता खरी गरज माणसांची आहे

कुशल हाताना आता खरे

एकजुटीने काम करायचे आहे


विस्कटलेले जनजीवन पुन्हा

प्रस्थापित करायचे आहे

आपल्या बांधवांना खरी मदत

तीच मोठ्या प्रमाणात लागणार आहे


प्रलयाला आता सामोरे जाताना

नको त्या गोष्टींना आवर घालायचा आहे

सारे पुरवून संकटातून बाहेर काढण्या

निसर्ग प्रकोपावर मात करायची आहे...


सुजाण बाहूंनो बाह्या सरकवून पुढे

संकटाचा सामना करण्या येऊ द्यात

त्या पिडीतांना श्वास सुखाचा

आता आनंदाने लवकर घेऊ द्यात...


सत्पात्री दान सुजाणतेपणाने होऊ दे

गरजवंताची गरज दूर पळून जाऊ दे

घडी जीवनाची पुन्हा लवकर बसू दे

मानवतेने पान्हा सहिष्णुतेचा आता फुटू दे...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama