प्रजासत्ताक दिन विशेष
प्रजासत्ताक दिन विशेष
झाला सत्तर वर्षांचा, प्रजासत्ताकाचा वृक्ष
त्याला जपण्यासाठी रे, देऊ जीवापाड लक्ष
त्याची काळजी वाहाणे, असे आपलेही काम
नको शासन सर्वत्र, गाळू आपणही घाम
झाले हुतात्मे अनेक, तेव्हा पाहिली ही घडी
एक राहोनिया सारे, नाव लावू पैलथडी
काय दिले या देशाने, प्रश्न विचारण्याआधी
जरा मनाची आपल्या, करू तपासणी साधी
हक्कापेक्षाही देऊ या, स्थान कर्तव्याला वर
देशी नांदावे गोकुळ, व्हावे आनंदित घर !
चला कसुनी कंबर, देऊ योगदान सारे
वाहो जगात गर्वाने, आता भारतीय वारे !!
