प्रेमाचा घास
प्रेमाचा घास
घास पहिल्या प्रेमाचा
चाखू अजूनही किती
स्वाद रेगाळे आजही
जीभ तुप्ती ना अती
सखी बघे प्रेमाने जो
मन पाझर झालो हो
एकटक नजर ती
आज धुंद लागीर हो
तोडे घास भरवे ती
चोखा तो अमृताचा हो
स्मितहास्य ओठावर
तेव्हा भासे ती परी हो
नानापरी पक्वान्ने ते
चव भिन्नता हाताची
गोडी मला लागले ती
साद असे ही प्रेमाची
दिस आठवे तो मनी
फुले चैतन्य जीवनी
एके पुन्हा चघळवी
घास दोन प्रेम मनी
