STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

प्रेम

प्रेम

1 min
17.2K


प्रेम


प्रेम तुझ्यावर किती कुणाचे

विचार याचा करशील कधी

कुठे? कसा तू होता मानवा

जन्माला इथे येण्या आधी?


नऊ मास उदरात आपुल्या

सांभाळले ज्या आईने तुला

किती रात्री जागविले तिज

करून तिचा बिछाना ओला


ऊन, पाऊस घेऊन डोईवर

बाप झिजला तुझ्याचसाठी

कृतज्ञतेने होशील का सांग

त्यांच्या वृद्धपणाची काठी


वृक्षाचे किती प्रेम तुझ्यावर

देण्या सावली ऊन्हे झेलती

खडा मारशील जरी तयाला

फळे सुमधूर तुला ते देती


मायभू वरच्या प्रेमा पोटी

प्राण स्वतःचे घेऊन हाती

सुरक्षित हा देश राखण्या

सैनिक लढतो सीमेवरती


आठव प्रभूचे प्रेम मानवा

तुला उठवतो,अन्न पचवतो

श्रमल्यावर विश्रांती घेता

झोपेत शांती प्रदान करतो


प्रेमच द्यावे, प्रेमच घ्यावे

प्रेम घेऊनि जगी फिरावे

झाडे, वेली, पशू नि पक्षी

सर्व जगावर प्रेम करावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational