STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4.8  

Sunita Ghule

Inspirational

प्लास्टिक बंदी

प्लास्टिक बंदी

1 min
1.2K


ऱ्हास जमिनीचा रोखण्यासाठी

टाळण्या सृष्टीचे पतन

प्लास्टिकबंदी काळाची गरज

चारशे वर्षांनी होते विघटन।


प्लास्टिक गाडता जमिनीत

पावसाचे पाणी नाही जिरत

परिणाम जलपातळीवर होता

जलसाठयांचे पाणी नाही वाढत।


ज्वलनाने प्लास्टिकच्या निर्मिती

जीवघेण्या विषारी वायूची

ऑक्सिजनचे घटते प्रमाण

मानवास भेट अनेक आजारांची।


प्लास्टिक जरी वापरास रोपे

कचऱ्याने घातले त्याच्या थैमान

प्लास्टिकबंदीचा कायदा शासनाचा

जागृत होऊन राखायचा मान।



प्लास्टिकला पर्याय आहेत अनेक

बदलण्या होऊ स्वतः कटिबध्द

आपण बदलू,दुसऱ्यास सांगू

प्लास्टिक वस्तू होतील निषिध्द।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational