पितृमोक्ष
पितृमोक्ष
कावकाव कावळ्या
ये रे तू माझ्या घरी,
पितृमोक्ष अमावस्या ही
मांडते तुला कागोरी.
छपरावरील कागोरी
जर का तू नाही खाल्ला,
पितृ होतील नाराज रे
मोक्ष मिळणार नाही मला.
संख्या होतोय तुझी
दिवसेंदिवस कमी रे,
असशील जिथे कुठे तर
आवर्जुन हाकेला ये रे.
वडा,पुरी ,भात भाजी
ठेवीन तुझ्या रे कागोरीत,
पितृंचे रुप रे घेऊन तू
क्षणात भर आपल्या चोचीत.
