फूल
फूल
रजईत झुडुपाच्या निजले निवांत फूल...
पण वाटेवरी तयाच्या भासे गंध मलूल...!!
शोधून स्वप्ने त्याने देठातच जपली होती...
अंगावरी तयाच्या आशेची पाकळी होती...!!
शेजारीच तयाच्या मोहर सांडला होता..!
भोवताली गारहिरवा वसंत नाचत होता..!!
जाळीत करवंदीच्या सुखे गाळली होती...!
पानांत झुडुपांच्या, नक्षत्रे माळली होती...!!!
अशा गर्द माळरानात, रात्र दबकत आली...
पैंजण न वाजवता, येऊन पाकळीवर निजली..!!

