STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

फुलपाखरा....

फुलपाखरा....

1 min
13.8K


मनोहरा फुलपाखरा, सुंदर तु दिसला

हृदयी भाव तुझा, ध्यास मज लागला

बघण्यास तुला, जीव अतुरला

रंग तुझा मज देशील का ? फुलपाखरा

जीवनात माझ्या येशील का ? फुलपाखरा .....

तुज तालात मज उडू दे, फुलांफुलांवर बसू दे

कुणी पाहील, कुणी पकडेल ,जरा सावध होऊ दे

तुज रंगात रंग माझा मिळू दे,फुलपाखरा

धुंद होऊनी नाचू , बागडू दे, फुलपाखरा

जीवनात माझ्या येशील का ? फुलपाखरा.....

तु नयनी भरला, तु मनी ठसला, मोहना

भान हरवले, तुज संगती फुलपाखरा

साथ साथ उडूया, मध पिऊया

चल,आनंद जीवनात भरुया फुलपाखरा

जीवनात माझ्या येशील का ? फुलपाखरा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational