फुले
फुले
गंध हा फुलाचा
भावे हा मनाला
फुलवितो बघा
किती या क्षणाला
रानात फुलली
ही रंगीत फुले
बघता हा रंग
मन पहा खुले
बहरुनि आला
निसर्ग हिरवा
आनंदाने गातो
हा मोर, पारवा
झाडांची ही फुले
वाऱ्यासंगे खेळी
आनंदाने घेत
झोके फुले कळी
ही रंगीत फुले
खुलतात किती
आनंदाने बघा
सुंदर नाचती
