STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

फुले , शाहू , आंबेडकरांचे ...

फुले , शाहू , आंबेडकरांचे ...

1 min
15.5K


हार असो या जीत नकोच गडे कसली चिंता

चालत रहा रे न डगमगता नित्य नेमाने ...

थांबला तो संपला उघडंच आहे

सोनं व्हावं आयुष्याचं हेच मागणे


इतिहास साक्षी म्हणा की इतिहासाची पुनरावृत्ती

होणारच इथे रावांचा रंक, नि रंगाचा राव ...

घाव सोसल्यावाचून सुंदर शिल्पही साकारत नाही

जीवन म्हणजे ऊन - पावसाचा खेळ नाकारत नाही ..


ऊतू नका रे मातू नका लबाडाचं आयुष्य थोडंच असतं

दुसऱ्याच्या घरात जाळ करून आपली घर उभारायचं नसतं

माहित्येय आम्हाला समाज तमाशां पाहून बिघडत नसतो

संतवाणी ऐकून कधीच सुधारणार नाही स्वतःपासून सुरुवात व्हावी


मी सुधारेन, कुटुंब, समाज अन् देशही खूणगाठ मनाशी बांधू

मुळासकट उपटून फेकू समाजातली दुही, प्रेमाची नाती प्रेमाने सांधू

आठवूं पुन्हा द्या, क्षमा, शांती, महापुरुषांनी पाहिलेली सर्वंकष क्रांती

सुजलाम - सुफलाम भारत घडवू, फुले, शाहू, आंबेडकरांचे पाईक आम्ही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational