फुलांच्या दुनियेत
फुलांच्या दुनियेत
करुयात सफर या फुलांच्या दुनियेत,
जाऊयात रमून त्यांच्याच समवेत
शहारून घेऊया अंग मऊ मऊ स्पर्शाने,
नाचू गाऊ अन फुलूयात यांच्या हर्षाने
वाहे असा हा मंद मंद निर्मळ वारा,
होई परिसर सुगंधी गंधाने सारा
धावून येती ही किडे अन फुलपाखरे
नका हात लावू खेळू द्या त्यांना स्वैरभरे
लाल पिवळी निळी जांभळी अन ही केशरी,
हिरव्या पानांत उठूनी दिसती कशी ही सारी
कोठे गुच्छ तर कोठे या फुलांचा सडा,
जपून चाला नाही तर ओरखडेल आघाडा
करुयात सफर या फुलांच्या दुनियेत,
जाऊयात रमून त्यांच्याच समवेत
