STORYMIRROR

Vanita Shinde

Inspirational

3  

Vanita Shinde

Inspirational

फरफट

फरफट

1 min
643



कोपला निसर्ग धरणीवरी

ढगफुटी होऊन अवकाळी,

धो धो बरसला वरुण राजा

फोडूनी अवचित डरकाळी..


टाकले विखरुनी जीवन

अस्ताव्यस्त झाले संसार,

या अवकाळी पावसाने

मोडले कित्येक घरदार..


अडकूनी वादळी वा-यात

गेली उडून घरांवरील छप्परं,

पडली कोलमडून किती झाडे

रस्त्यावर पाणी,तुंबली गटारं.


अवचित त्याच्या येण्याने

जीवांचीही झाली हानी,

बघता क्षणी अचानक

होऊन गेली धुळधानी..


कर्जाचा डोंगर माथी

घेऊन राबला शेतकरी,

पिकविले पिक जोमाने

फुलवली कष्टाने शेतसरी..


होता गारपिट अचानक

हादरला बळी निराशेने,

हाती आलेला घास तोंडचा

घेतला काढून पावसाने..


कित्येक गमावले जीव

गमावले किती काही,

होत्याचे केले नव्हते

तरी दया त्याला नाही..


बघ करुनी कशी फरपट

बिघडली जीवनाची घडी,

टाकले क्षणात विस्कटून

कोसळली आशेची माडी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational